Ashneer Grover : भारतपेचे (BharatPe) संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या शोमुळे चर्चेत आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊयात शार्क टँक इंडिया या शोमध्ये येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या कार्यक्रमाचा अश्नीर ग्रोव्हर परिक्षक होता. शार्ट टँक आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर तयार करण्यात आलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मिम्सबाबत तसेच ट्रोलर्सबद्दल अश्नीरनं त्याचं मतं मांडलं आहे.
कॉमेडियन रोहन जोशी आणि साहिल शाह यांच्यासोबत केलेल्या चर्चेत अश्नीरनं सांगितलं, 'मला सोशल मीडियावर लोक शिव्या देतात मी रात्री तीन वाजता उठून कमेंट्स डिलीट करतो. मी काही लोकांना ब्लॉक देखील केले आहे. '
अश्नीर हा लग्झरी लाईफास्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. शार्क टँक इंडियाचे परिक्षण करणाऱ्या अश्नीरचे काही लोक कौतुक करतात तर काही जण त्याला ट्रोल करतात. रिपोर्टनुसार या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी अश्नीर दहा लाख रूपये मानधन घेतो. अश्नीर ग्रोव्हरने IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्याने IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.
संबंधित बातम्या
- Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Samantha : फिटनेस फ्रिक समंथा करत होती 'या' आजाराचा सामना; सोडावा लागला होता चित्रपट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha