Jhund Trailer : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' (Jhund) सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे. 


फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा 


'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. सिनेमात अमिताभ बच्चन निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विजय बारसे हे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी तसेच फुटबॉलचा संघ तयार करण्यास प्रोत्साहित करतात. ते स्लम सॉकरचे संस्थापक देखील आहेत.





झुंड नाही संघ म्हणा असे म्हणत सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. झुंड सिनेमा 18 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये परश्या आणि आर्चीचा अनोखा अंदाज दिसत आहे. 







संबंधित बातम्या


Farhan Akhtar, Shibani Dandekar : 'रॉयल वेडिंग'; शिबानी-फरहाननं शेअर केले लग्न सोहळ्यातील खास फोटो


Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात


फरहान अख्तरसोबत लग्नानंतर शिबानी दांडेकरने बदललं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधाण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha