एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'देवयानी' मालिकेतील आणखी एका कलाकाराचे प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री

Marathi Serial Updates Star Pravah :  सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये ट्वीस्ट येत आहेत. आता स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरलेल्या 'देवयानी' या मालिकेतील आणखी एका कलाकाराचे स्टार प्रवाहवर कमबॅक होत आहे.

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावर सध्या काही नवीन मालिका आल्या आहेत. तर काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीसाठी ही स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे प्रेक्षकांना खिळवण्यासाठी सध्या प्रसारीत होणाऱ्या मालिकांमध्ये नवा ट्वीस्ट आणला जात आहे. सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये ट्वीस्ट येत आहेत. आता स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरलेल्या 'देवयानी' या मालिकेतील आणखी एका कलाकाराचे स्टार प्रवाहवर कमबॅक होत आहे. 'देवयानी' आणि 'गोठ' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा माधव देवचके (Madhav Deochake) आता 'अबोली'  (Aboli Serial) मालिकेत झळकणार आहे. 

मालिकेत नवा ट्वीस्ट

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. श्रेयस सुमन मराठे या नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार हे पाहाणं उत्सुकतेचं असेल.

कशी आहे श्रेयस मराठेची व्यक्तीरेखा?

सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके जवळपास 6 वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. याआधी 'देवयानी' आणि 'गोठ' या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखिल हटके असणार आहे. श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे नावासोबतच तो आईचही नाव लावतो. अतिशय हुशार, यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार हे अबोली या मालिकेत दिसणार आहे. अबोली ही मालिका रात्री 10.30 वाजता  स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होते. 

शिवानी सुर्वेचंही कमबॅक

स्टार प्रवाह वाहिनीवर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून शिवानी सुर्वे स्टार प्रवाहवर तब्बल 9 वर्षांनी कमबॅक करत आहे. त्याशिवाय, अभिनेता समीर परांजपे हा देखील आठ वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक करत आहे. समीर परांजपे हा 'गोठ' मालिकेत झळकला होता.

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget