एक्स्प्लोर

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi :  'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नाट्यमय वळण, ओवीवर जीवघेणा हल्ला, निशी होती का टार्गेट?

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : ओवीवर प्राणघातक हल्ला झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे. आता या हल्ल्यामागे कोण आहे, खरंच हा हल्ला गुन्हेगारांनी केला की त्यांना सुपारी दिली? अशा अनेक प्रश्नांची उकल होणार आहे.

Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi :  सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सध्या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये वळण येत आहेत. झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिकेतही आता नाट्यमय वळण येणार आहे.  रघुनाथ खोतांची लेक निशी आणि नीरज यांचा विवाह सोहळा नुकताच पार पाडला. मात्र, आता या कुटुंबावर संकट कोसळणार आहे.  उमाची भाची ओवीवर प्राणघातक हल्ला झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे. आता या हल्ल्यामागे कोण आहे, खरंच हा हल्ला गुन्हेगारांनी केला की त्यांना सुपारी दिली?  अशा अनेक प्रश्नांची उकल होणे बाकी आहे. 

सारं काही तिच्यासाठी मालिकेत निशी आणि नीरजचे प्रेम प्रकरण अनेक अडथळ्यांना पार करून विवाह बंधनात अडकले आहेत. तर, दुसरीकडे आता श्रीनिवास आणि ओवी यांच्या प्रेमाची परीक्षा सुरू होणार आहे. मंजूची भाची चारूची देखील श्रीनिवाससोबत लग्न करण्याची इच्छा आहे, त्यासाठी ती मंजूची मदत घेत आहे. चारूने श्रीनूची आई लालीवर प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. 

निशीचा गृहप्रवेशापासून अडथळे

लग्नानंतर आता निशीने नीरजच्या घरात गृहप्रवेश केला आहे. मात्र, सुरुवातीपासूनच निशीच्या गृहप्रवेशानंतर अपशकुन वाटाव्या अशा घटना सुरू आहेत. त्यामुळे या घटना योगायोग आहे की मेघनाचा त्यामागे हात आहे, याचा उलगडा अद्याप झाला नाही. 

ओवीवर प्राणघातक हल्ला

निशीची पाठराखण म्हणून ओवीदेखील तिच्यासोबत सासरी गेली आहे.ओवी आणि निशीच्या बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवतात. हा गेट टुगेदर आटोपून निशी आणि ओवी परत येत असताना
सुनसान रस्त्यावर दोन गुंड येऊन त्यांच्या कडचे पैसे आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निशी आणि ओवी त्यांचा प्रतिकार करतात. चोरांकडून निशीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतात. पण, निशी त्याला विरोध करते. ओवीदेखील प्रतिकार करत निशीला वाचवते.पण त्या झटापटीत ओवी गंभीर जखमी होते. 

ही  घटना घडत असताना दुसरीकडे खोतांच्या घरी लाली श्रीनिवासच्या लग्नाबाबत घरी चर्चा छेडते आणि चारूचे नाव पुढे करते. त्यावर उमा आणि रघुनाथ हे श्रीनिवासला लग्नाबाबत विचारले का, त्याची इच्छा आहे का, असे विचारतात. श्रीनिवास काही बोलण्याच्या आधी निशीचा रघुनाथला फोन येतो. निशी खूप घाबरलेली असते. निशीच्या फोनने  रघुनाथ आणि घरातले लोक चिंतेत येतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 

निशी आणि ओवीवर हल्ला करणारे खरंच चोर होते का, त्यांच्यावर हल्ला करणारे कोणी पाठवले? हल्लेखोरांच्या निशाण्यावर ओवी होती की निशी? मेघना पुन्हा कटकारस्थान करतेय की चारूलाच ओवीचा काटा काढायचा आहे? अशा अनेक प्रश्नांची उकल आता आगामी काही एपिसोडमध्ये होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case: '...त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही'; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?
'...त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही'; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?
Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Sanchita Ugale TV Actress Last Rites: 'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Embed widget