Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Boyz 4 : कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बॉईज 4'चं पोस्टर आऊट!
Boyz 4 Poster Out : 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झालं आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Teen Adkun Sitaram: तीन तरुणांची भन्नाट गोष्ट; तीन अडकून सीतारामचा धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Teen Adkun Sitaram: तीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये , वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), संकर्षण कर्हाडे (Sankarshan Karhade) आणि आलोक राजवाडे (Alok Rajwade) हे तिघे मज्जा मस्ती करताना दिसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jui Gadkari Exclusive : 'ठरलं तर मग'नंतर जुईचं 'पुढचं पाऊल', खऱ्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर
Jui Gadkari Wedding Update : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे जुईची 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका गाजत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता या मालिकेतील सायली खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bhushan Pradhan: अभिनेत्यानं सांगितला ‘भूषण सीमा प्रधान’ नावामागचा किस्सा; म्हणाला, 'अनेकांना वाटतं...'
Bhushan Pradhan: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. भूषणच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पिंजरा, कुंकू या मालिकांच्या माध्यमातून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला. भूषणनं नुकताच त्याच्या नावामागील किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तसेच त्यानं स्ट्रगल स्टोरी देखील सांगितली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pooja Sawant : गणेशचतुर्थीपासून पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद; मोदकावर ताव मारायला पूजा सावंत सज्ज
Pooja Sawant On Kalavantancha Ganesh : कलरफुल पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच तिच्या सिनेमांमुळे आणि प्राणीप्रेमामुळे चर्चेत असते. आता एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्रीने बाप्पासोबतच्या तिच्या आठवणी सांगितल्या आहे. गणपती बाप्पा हा कलेचं दैवत असून तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असं पूजा सावंत म्हणाली.