Teen Adkun Sitaram: तीन अडकून सीताराम (Teen Adkun Sitaram) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये , वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), संकर्षण कर्हाडे (Sankarshan Karhade) आणि आलोक राजवाडे (Alok Rajwade) हे तिघे मज्जा मस्ती करताना दिसत आहेत.
तीन अडकून सीताराम या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला दिसते की, तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहेत. हे तिघेही दारुच्या नशेत आहेत. या तीन तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात? याची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.
हृषीकेश जोशीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हृषीकेश जोशीनं तीन अडकून सीतारामचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रतीक्षा करू शकत नाही. लवकर रिलीज कारा. सगळेच भन्नाट आहेत.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'संकर्षण सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा'
पाहा टीझर:
'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाची स्टार कास्ट
तीन अडकून सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादीनं पुष्कराज ही भूमिका साकारली आहे. तर संकर्षण कर्हाडेनं या चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माळी,गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत.
चित्रपट कधी होणार रिलीज?
तीन अडकून सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं डायलॉग्स हृषीकेश जोशीने लिहिले आहेत. तसेच प्रकाश वैद्य, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या