Bhushan Pradhan:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. भूषणच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पिंजरा, कुंकू या मालिकांच्या माध्यमातून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला. भूषणनं नुकताच त्याच्या नावामागील किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तसेच त्यानं स्ट्रगल स्टोरी देखील सांगितली.


सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भूषणनं त्याच्या नावाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'बऱ्याच जणांना असं वाटतं की, आई- वडिलांचा घटस्फोट झाला किंवा त्यांचे एकमेकांशी पटत नाही, म्हणून आईचं नाव लावतात. पण तसं काही नाही. मी मझ्या वडिलांवर देखील प्रेम करतो. मला घडवण्यात दोघांचाही वाटा आहे. पण आईचा जास्त आहे. मला आईनं खूप सपोर्ट केला. जेव्हा मी अभिनेता झालो, तेव्हा मी विचार केला की मी , वडिलांचे आडनाव लावतो  पण ज्या आईनं कष्ट घेतले तिचं नाव लोकांना कळत नाहीये. माझ्या सक्सेसमध्ये आईचा वाटा जास्त आहे. त्यामुळे मी भूषण सीमा प्रधान असं नाव लावतो. '


मुलाखतीमध्ये भूषणनं सांगितलं, 'एमजी रोडच्या सिग्नलवर पॅप्लेट देखील वाटले. त्याचे मला दीडशे रुपये मिळत होते. त्या पैसाचा वापर मी पोर्टफोलिओ करण्यासाठी करायचो' स्ट्रगलबाबत भूषण म्हणाला, 'आजही मी स्ट्रगल करतो. प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतो. मी  पहिलं नाटक वयाच्या आठव्या वर्षी केलं होतं. शाळेत असताना मी अॅक्टर म्हणून ओळखला जात होतो. प्रत्येकाचा वेगळा स्ट्रगल असतो. '






भूषणनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम


भूषणनं मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यानं    दोघी, कॉफी आणि बरंच काही,   मिस मॅच, टाइमपास, सतरंगी रे, टाइमपास 2 या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. तसेच गोंद्या आला रे  या वेब सीरिजमध्ये त्यानं साकारलेल्या  दामोदर हरी चापेकर यांची भूमिका साकारली. या वेब सीरिजमधील भूषणच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.


इतर महत्वाच्या बातम्या:


Bhushan Pradhan: भूषण प्रधानचा स्वॅग; शेअर केले डॅशिंग लूकमधील फोटो