Jui Gadkari Wedding Update : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे जुईची 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका गाजत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता या मालिकेतील सायली खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


'ठरलं तर मग' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमित भानुशालीला जुईच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. जुईच्या लग्नाची तारीख काय असेल असं विचारताच अमित म्हणाला,"24 फेब्रुवारी 2024". अमितने सांगितलेली ही तारीख दुरुस्त करत जुई म्हणाली,"अमित थोडासा चुकलाय कारण लग्नाची तारीख 4 फेब्रुवारी आहे". जुई-अमितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अभिनेत्री 4 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार अशा बातम्या येऊ लागल्या.


खऱ्या लग्नाबाबत एबीपी माझाशी बोलताना जुई गडकरी म्हणाली,"पुढचं पाऊल', 'वर्तुळ','सरस्वती' आणि 'ठरलं तर मग' या माझ्या चारही मालिकांची लग्न योगायोगाने 4 फेब्रुवारीला वेगवेगळ्या वर्षी शूट झाली आहेत. काही दिवसांपूर्वी 'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवर सिनेपत्रकार मंडळी आली होती तेव्हा चेष्टेत माझ्या खऱ्या लग्नाचा विषय निघाला होता. हा जुना व्हिडीओ हा व्हायरल होत आहे. खऱ्या आयुष्यातही 4 फेब्रुवारीला लग्न करायला मला आवडेलच.. त्यासाठी आधी मुलगा शोधावा लागेल". 


जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिने साकरलेल्या सायलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना','तुजविण सख्या रे' अशा अनेक मालिकांमध्ये जुईने काम केलं असलं तर 'पुढचं पाऊल' या मालिकेच्या माध्यमातून जुईला खरी ओळख मिळाली आहे. त्यानंतर जुईने 'वर्तुळ' आणि 'सरस्वती' या मालिकांमध्ये काम करते. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. 


जुईची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर


जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. आदेश, सुचित्रा आणि सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत.


संबंधित बातम्या


Jui Gadkari : शाडूचा गणपती, कापडी फुलांची सजावट, मोदक अन् घरच्याच विहिरीत विसर्जन; जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत