Gautami Patil Movie : सबसे कातील गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता नृत्यांगना रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरू एक संघर्ष' (Ghungaroo Ek Sangarsha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


गौतमीचा 'घुंगरू' पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित! (Gautami Patil Ghungaroo Release Date)


गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमासंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. गौतमीचा 'घुंगरू' (Ghungaroo) हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे.


गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या नृत्य अदांनी गौतमीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना घायाळ केलं आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा सिनेमा खूपच खास आहे.


गौतमीच्या 'घुंगरू' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Ghungaroo Movie Details)


'लावणी क्वीन' गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमात प्रेक्षकांना लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, रहस्यमय गोष्टी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खूर्चीला बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल, असे म्हटले जात आहे.


लोक कलावंतांचा संघर्ष उलगडणारा 'घुंगरू' 


'घुंगरू' या सिनेमाचं सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. सिनेमाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून पुढील महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोक कलावंतांचा संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असेल. गौतमी पाटीलचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.


'घुंगरू' या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत आहेत. त्या दोघांसह सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सोलापूर, माढा, हंपीसह परदेशातही या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. 


संबंधित बातम्या


Gautami Patil : गौतमी पाटीलला नवरा कसा हवाय? तिच्या काय अपेक्षा आहेत? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? वाचा काय म्हणाली गौतमी पाटील