Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेचा शेवटचा एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीस; वीरेंद्र प्रधान पोस्ट शेअर करत म्हणाले, 'टीआरपी नाही हे कारण...'


Yashoda - Goshta Shyamchya Aaichiछोट्या पडद्यावरील 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda - Goshta Shyamchya Aaichi) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.  या मालिकेचा शेवटचा एपिसोड 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध लेखक, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते  वीरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी नुकतीच यशोदा या मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sai Lokur: कुणीतरी येणार येणार गं! सई लोकूर होणार आई, पतीसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज


Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरच्या (Sai Lokur) घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सईनं सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे (Tirthadeep Roy) खास फोटो शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. सईनं फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Baipan Bhaari Deva: 'सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात...'; केदार शिंदे यांची खास पोस्ट


Baipan Bhaari Deva: केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात सहा महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटानं स्वातंत्र्य दिनाला देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. याबाबत केदार शिंदे यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Taali : हेमंत ढोमे ते सुबोध भावे; 'या' मराठी कलाकारांनी केलं सुष्मिताच्या 'ताली' वेब सीरिजचं कौतुक


Taali: अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen)'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज 15 ऑगस्टला या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं तसेच या सीरिजच्या कथानकाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता काही मराठी कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ताली या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' मालिका रोमांचक वळणावर; पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य! किशोरी शहाणे सहा वर्षांनी करणार छोट्या पडद्यावर कमबॅक


Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' (Pinkicha Vijay Aso) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीट आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. पिंकीला नवा चेहरा आणि नवं आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेचे आगामी भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा