Pinkicha Vijay Aso : 'पिंकीचा विजय असो' (Pinkicha Vijay Aso) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीट आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. पिंकीला नवा चेहरा आणि नवं आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेचे आगामी भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.
'पिंकीचा विजय असो' ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. गजराजने पिंकीचा खून केल्यानंतर पिंकीने जगाचा निरोप घेतला की काय असं वाटत असतानाचा आता मालिकेत पुन्हा एकदा पिंकीची नव्या रुपात एन्ट्री होणार आहे. गजराज विरुद्ध पिंकीच्या या लढ्यात पुन्हा एकदा विजय पिंकीचाच होणार आहे.
पिंकीला हे नवं रुप दिलंय प्लास्टिक सर्जन देवयानी सदावर्ते यांनी. निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते यावर देवयानी यांचा विश्वास आहे. अतिशय सकारात्मक आणि कोणत्याही वाईट गोष्टीत चांगलं शोधण्याची वृत्ती असणाऱ्या डॉ. देवयानी सदावर्ते पिंकीला तिच्या अपघातातून सावरतात आणि नवं जीवन आणि नवा चेहरा देतात. पिंकीच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होतेय असंच म्हणायला हवं.
किशोरी शहाणे- विज सहा वर्षांनी करणार छोट्या पडद्यावर कमबॅक!
लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे-विज 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत शुभांगी सदावर्ते ही भूमिका साकारणार आहेत. जवळपास सहा वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून ते छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'पिंकीचा विजय असो' या मालिकेबद्दल बोलताना किशोरी शहाणे म्हणाल्या की,"पिंकीचा विजय असो' या मालिकेसाठी मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी होकार दिला. मला हे पात्र खूपच आवडलं होतं. 'पिंकीचा विजय असो' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. डॉ. शुभांगी सदावर्ते पिंकीला नवा चेहरा देतात. मला खात्री आहे मालिकेतलं आणि पिंकीच्या आयुष्यातलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
अतरंगी सतरंगी पिंकीची गोष्ट
आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत पाहायला मिळत आहे.
पिंकीचा विजय असो
कुठे पाहाल? स्टार प्रवास
किती वाजता? रात्री 11 वाजता
संबंधित बातम्या