Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरच्या (Sai Lokur) घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सईनं सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे (Tirthadeep Roy) खास फोटो शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. सईनं फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सईनं शेअर केले फोटो


सईनं तीर्थदीपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये सईच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे.या फोटोला सईनं कॅप्शन दिलं, 'प्रेम आणि कृपेने आमचे कुटुंब वाढत आहे. आम्‍हाला तुम्‍हाला कळवण्‍यास अत्‍यंत आनंद होत आहे, आमच्या  आयुष्यात लवकरच खूप आनंद येणार आहे.'






सईनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पिंक अँड व्हाईट कफ्तान आणि हाय हेअर बन अशा लूकमध्ये दिसत आहे. तर तीर्थदीप हा व्हाईट टीशर्ट आणि ग्रे पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. सई आणि तीर्थदीप यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 





सईनं तीर्थदीप रॉयसोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली सई ही तीर्थदीपसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 


सई लोकूरनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील सई, मेघा धाडे आणि पुष्कर जोग या तिघांच्या मैत्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.


सईनं कुछ तुम कहो कुछ हम कहे,पकडा गया, मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म, पारंबी ,आम्हीच तुमचे बाजीराव, कीस किसको प्यार करू या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


सई ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 317K फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपूर्वी सई सध्या फुकेत येथे ट्रीपला गेली होती. या ट्रीपचे फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या:


PHOTO : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री लुटतेय सुट्टीचा आनंद, शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो!