Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Hemangi Kavi: 'खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात...'; नेटकऱ्याच्या पोस्टला हेमांगी कवीनं दिलेल्या रिप्लायनं वेधलं लक्ष


Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. हेमांगी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. तसेच चाहत्यांच्या कमेंट्सचा देखील हेमांगी रिप्लाय देते. एका नेटकऱ्यानं नुकतीच  मासिक पाळीबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला हेमांगीनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' कार्यक्रमात अभिनेत्री वंदना गुप्ते लावणार हजेरी; रंगणार धारदार प्रश्नांसह, खुमासदार उत्तरांची मैफील!


Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)  या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते या गेल्या काही दिवसांपासून  'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वंदना गुप्ते या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात विविध मजेशीर किस्से सांगणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Spruha Joshi: "तो माझा सासरा, पण..."; स्पहानं प्रथमेश लघाटे आणि तिच्या नात्याबाबत दिली माहिती


Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या मालिका आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. स्पृहा तिच्या अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या आणिवरद लघाटेच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितलं.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Baipan Bhaari Deva:  जेव्हा क्रिकेटचा "देव" "बाईपण भारी देवा" बघतो; सचिन तेंडुलकरनं चित्रपट पाहिल्यानंतर दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर साधला संवाद, व्हिडीओ व्हायरल


Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकताच हा चित्रपट सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) पाहिला. सचिन तेंडुलकरनं "बाईपण भारी देवा" हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Rujuta Deshmukh : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अभिनेत्रीची लूट? ऋजुता देशमुख नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली,"खरचं असा नियम आहे का?"


Rujuta Deshmukh : मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुख (Rujuta Deshmukh) सध्या चर्चेत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवर प्रवास करताना अभिनेत्रीकडून जास्त टोल आकारण्यात आला आहे. आता अभिनेत्रीची खरचं लूट झाली आहे की खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का? असा प्रश्न तिने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) टॅग करत चाहत्यांना विचारला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा