Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या मालिका आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. स्पृहा तिच्या अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या आणिवरद लघाटेच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितलं.

  


 सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पृहानं सांगितलं, "वरद आणि मी कॉलेजमध्ये असताना एका अॅक्टिव्हिटीसाठी एका टीममध्ये काम केलं. वरद तिथे माझा सिनियर होता. 2014 मध्ये आम्ही लग्न केलं. वरदला अॅक्टिंग करणारी मुलगी नको होती. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की, मला अभिनयात करिअर करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही डेट करायचा निर्णय घेतला. पण नंतर मी त्याला माझा निर्णय सांगितला की, मला अभिनयातच करिअर करायचं आहे. जेव्हा अग्निहोत्रचं शूटिंग सुरु होतं, तेव्हा तो मला भेटायला पुण्याला आला होता. मला भेटायला त्यानं अनेकदा ऑफिसमधून सुट्टी घेतली होती."


काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि  मुग्धा वैशंपायन हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याबाबत प्रथमेश आणि मुग्धा यांनी पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होती.  प्रथमेश आणि मुग्धा यांच्या पोस्टवर स्पृहानं कमेंट केली होती,"व्हा बुवा... वहिनी तुमचं स्वागत आहे" तिच्या या कमेंटवर अवधूत गुप्तेने लिहिलं होतं,"जीजूंचं स्वागत नाही करणार का?" त्यावर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं,"अहो सर... ते आधीच सासरे आहेत माझे". तर यावर प्रथमेशने कमेंट करत लिहिलं आहे,"सासरा आहे मी तिचा". तर मुग्धाने लिहिलं आहे,"मी सासू... नो...". स्पृहाच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की, मुग्धा ही स्पृहाची सासूबाई होणार आहे.


प्रथमेश लघाटेसोबतच्या नात्याबाबत स्पृहानं मुलाखतीमध्ये सांगितलं, "प्रथमेश लघाटे हा वरदच्या नातेवाईकांपैकी एक आहे. प्रथमेश नात्यानं माझा सासरा आहे. पण तो मला धाकट्या भावासारखा आहे. जेव्हा प्रथमेश आणि मुग्धा यांचे ठरले तेव्हा सोशल मीडियावर अशी चर्चा झाली की, मुग्धा स्पृहाची सासूबाई होणार."


स्पृहा ही  काही दिवसांपूर्वी  ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. नेव्हर माईंड,पेईंग घोस्ट,बायोस्कोप,लहानपण देगा देवा,नांदी,समुद्र या नाटकांमध्ये स्पृहानं काम केलं.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Spruha Joshi: स्पृहा सहा वर्षाची असताना तिच्या आई-बाबांनी दिलं होतं 'हे' खास गिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा