Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकताच हा चित्रपट सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) पाहिला. सचिन तेंडुलकरनं "बाईपण भारी देवा" हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.


दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सचिनसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'जेव्हा क्रिकेटचा "देव"... "बाईपण भारी देवा" सिनेमा पहातो... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.' राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी देखील "बाईपण भारी देवा" हा चित्रपट पाहिला. केदार शिंदे यांनी  राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.






सचिन तेंडुलकरनं दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर साधला संवाद


"बाईपण भारी देवा" हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरनं दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. दीपानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सचिन तेंडूलकरसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "THE DREAM COME TRUE MOMENT सचिन... द सचिन तेंडुलकर... लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं... ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील. त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण...YES...It’s Fact... शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण. मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो... आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो... आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं... अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU  निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोनसाठी."






संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva: 'प्रोडक्ट बाजारात विकण्यासाठी...'; 'बाईपण भारी देवा' च्या यशाबाबत विजू मानेंनी शेअर केली पोस्ट