Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. हेमांगी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. तसेच चाहत्यांच्या कमेंट्सचा देखील हेमांगी रिप्लाय देते. एका नेटकऱ्यानं नुकतीच मासिक पाळीबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला हेमांगीनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
एका नेटकऱ्यानं मासिक पाळीबाबत एक पोस्ट फेबुकवर शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला.स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ' *वैज्ञानिक कारणं* ' सांगणारा. का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I mean, हद होती है यार! म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास 1 मिलियन लाईक्स!" मासिक पाळी आणि त्यासंबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींबाबत या नेटकऱ्यानं पोस्टमध्ये लिहिलं. या पोस्टला हेमांगीनं रिप्लाय दिला आहे.
हेमांगीचा रिप्लाय
हेमांगीनं नेटकऱ्याच्या पोस्टला रिप्लाय दिला, "खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!"
हेमांगीच्या या रिप्लायवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मला हे माझ्या बायकोला सुद्धा समजावता आलेले नाहीये अजून पर्यंत, ती कॉलेजमध्ये life sciences ची प्राध्यापिका आहे.' या नेटकऱ्याच्या कमेंटला हेमांगीनं रिप्लाय दिला, 'म्हणजे हे किती खोलवर रूजलंय!' 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगीच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. हेमांगी ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर हेमांगीला 385k फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: