Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)  या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते या गेल्या काही दिवसांपासून  'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वंदना गुप्ते या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात विविध मजेशीर किस्से सांगणार आहेत. 


नुकताच 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वंदना गुप्ते या डान्स करत 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या मंचावर एन्ट्री करतात. त्यानंतर त्या एक मजेशीर किस्सा सांगतात. त्या म्हणातात, "मला जेव्हा शिरीषनं प्रपोज केलं, तेव्हा मी तिच्या कुटुंबाला भेटायला त्याच्या घरी गेले. माझ्या सासूबाईंनी मला विचारलं की, गाणं म्हणशील का? तेव्हा मी पाडाला पिकलाय आंबा हे गाणं म्हणलं. तेव्हा माझा होणारा नवरा तिथे बसला होता. तेव्हा त्यानं जी मान खाली घातली होती ती अजून वर काढलेली नाही."


पाहा प्रोमो: 






 वंदना गुप्ते  यांच्या  'बाई पण भारी देवा'  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते  यांच्यासोबतच रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता  वंदना गुप्ते या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये कोणकोणते किस्से सांगणार आहेत? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Shreyas Talpade: जेव्हा कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणाला होता 'पनौती'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये अभिनेत्यानं सांगितला किस्सा