Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ajay Purkar: 'सुभेदार'नंतर आता अजय पुरकर साऊथ चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'स्कंदा'च्या दिग्दर्शकानं केलं तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ


Ajay Purkar: अभिनेते  अजय पुरकर (Ajay Purkar)  यांचा   'सुभेदार' (Subhedar)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अजय पुरकर यांनी  तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. आता अजय पुरकर हे एका साऊथ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'स्कंदा' (Skanda) असं आहे. स्कंदा चित्रपटाचे दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये अजय पुरकर यांचे कौतुक केले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते'मध्ये चंद्रमुखी लावणार हजेरी ; अमृता खानविलकर देणार अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं


Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये  चंद्रमुखी  अशी ओळख असणारी अभिनेत्री  अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही हजेरी लावणार आहे. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अमृता ही अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Akshaya Deodhar: “पावसाळा संपत आला, येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते..."; मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये अक्षया देवधरने घेतला खास उखाणा


Akshaya Deodhar And Hardeek Joshi: अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. अक्षया आणि हार्दिक हे दोघे लग्नानंतरचा प्रत्येक सण थाटामाटात साजरा करत आहेत. नुकतीच अक्षयाची पहिली मंगळागौर पार पडली. अक्षयानं तिच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये अक्षया ही उखाणा घेताना दिसत आहे. 


सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक 


Megha Dhade: अभिनेत्री मेघा धाडेची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'कलाकारांना पक्षाशी जोडून...'


Megha Dhade: अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade) काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केला.  सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघानं ही माहिती चाहत्यांना दिली होती. आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतीच याबाबत मेघानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.   


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा