Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दु:खा म्हणजेच हेच असतं- कळालं ऑडियन्सला . निरोप घ्या आणि प्रेक्षकांना सुखी करा. नवीन मालिकेला स्कोप द्या' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'काय स्टोरी आहे व्वा! किती वेड्यात काढायचं?'
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेची स्टार कास्ट
गिरीजा प्रभू (Girija Prabhu), मंदार जाधव (Mandar Jadhav) ,वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), माधवी निमकर (Madhavi Nimkar) यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेतील गौरी जयदीप शिंदे (Gauri Jaydeep Shinde) ही भूमिका गिरीजानं साकारली आहे, तर जयदीप सूर्यकांत शिंदे ही भूमिका मंदार जाधवनं साकारली आहे. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या आगामी एपिसोडची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :