Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वायपेयीनं (Manoj Bajpayee) 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हजेरी लावली आहे. नुकताच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मनोज हा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील कलाकारांची कॉमेडी पाहून खळखळून हसताना दिसत आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये भाऊ कदम हा भिकू म्हात्रेच्या लूकमध्ये दिसत आहे. मनोज वायपेयीनं 'सत्या' या चित्रपटात भिकू म्हात्रेची भूमिका साकारली होती. प्रोमोमध्ये मनोज वायपेयीसोबतच संतोष जुवेकर देखील दिसत आहे.
मनोज वायपेयीचा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. द फॅमिली मॅन,गँग्स ऑफ वासेपूर , स्पेशल 26 या मनोजच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मनोज हा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात कोणते किस्से सांगणार आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 29 मे रोजी रात्री 9.30 वाजता 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बघावा लागणार आहे.
पाहा प्रोमो:
1995 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'स्वाभिमान' या मालिकेत काम करून मनोज वाजपेयी यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.शेखर कपूरच्या प्रसिद्ध चित्रपट 'बँडिट क्वीन'मध्ये मनोज वाजपेयी रुपेरी पडद्यावर झळकले होते. राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' चित्रपटातील ‘भिकू म्हात्रे’च्या भूमिकेने त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.
भाऊ कदम,निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या: