Chala Hawa Yeu Dya:  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. सध्या  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमाच्या लहान तोंडी मोठा घास या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बच्चे कंपनी एक विनोदी स्किट सादर करताना दिसत आहे.  


 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या मंचावर काही लहान मुलं विनोदी स्किट सादर करणार आहेत. त्यांच्या स्किटचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेत्री श्रेया बुगडे देखील या प्रोमोमध्ये दिसत आहेत.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये  माझी तुझी रेशीमगाठ  फेम मायरा वैकुळसोबत काही लहान मुलांचा कॉमेडी अंदाज दिसत आहे.  'चला हवा येऊ द्या'  कार्यक्रमाच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात बच्चे कंपनीचे कॉमेडी प्रेक्षकांना 15 मे पासून पाहता येणार आहे. सोमवार ते मंगळवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षक 'चला हवा येऊ द्या'  हा कार्यक्रम पाहू शकतात.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात या बच्चे कंपनीला बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा प्रोमो






'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये बच्चे कंपनीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Chala Hawa Yeu Dya: माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा म्हणते,'लहान तोंडी मोठा घास' ; ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री, पाहा प्रोमो