Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि 'बिग बॉस' फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 


गोरी नागोरीचा (Gori Nagori) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगड येथे पोहोचल्यानंतर हल्ला कसा झाला हे सांगितले आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली असता त्यांनी सेल्फी काढून तिला परत घरी पाठवले. 


गौरीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली... (Gari Nagori Shared Video)


गोरीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी गोरी...आज माझ्यासोबत घडलेला प्रकार कोणासोबत घडू नये. त्यामुळे मुद्दाम मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीचं 22 मे रोजी लग्न होतं. मी शहरात राहते आणि मला वडील आणि भाऊ नाही. तर माझा एक मोठा मेहुणा आहे. त्याचं नाव जावेद आहे. त्याने सांगितलं की हे लग्न किशनगडमध्ये करा... मी सर्व व्यवस्था करीन". 






गोरीने पुढे लिहिलं आहे की,"मेहुण्याच्या सांगण्यावरुन मी किशनगडमध्ये लग्न केलं. पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की हा त्याचा कट आहे. किशनगडमध्ये माझ्यासह संपूर्ण टीमवर मेव्हण्याने आणि त्याच्या मित्राच्या भावाने खूप वाईट हल्ला केला. दरम्यान आम्हाला मारहाणदेखील करण्यात आली. तर दुसरीकडे हे घरगुती प्रकरण असून ते घरीच सोडवा असा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांनी खूप वेळ मला बसवून ठेवलं. त्यानंतर माझ्यासोबत सेल्फी काढला आणि घरी जाण्यास सांगितलं". 


गोरीने राजस्थान सरकारकडे केली सुरक्षा देण्याची विनंती


गोरी ही मुलगी असून तिच्या जीवाचं काय बरं-वाईट झालं तर अशी तिला भीती वाटत आहेय त्यामुळे राजस्थान सरकारने लवकरात लवकर सुरक्षा द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती गोरीने केली आहे. हरियाणाची 'शकीरा' गोरी नागोरीला 'बिग बॉस'मुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून हरियाणाची 'शकीरा' गोरी नागोरी आऊट; बाहेर पडल्यावर मराठमोळ्या शिव ठाकरेला म्हणाली,"सरड्यासारखा रंग बदलणारा..."