TRP Top Shows List: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  या शोमधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. तसेच  प्रिया आहुजाने देखील मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले. आता या कॉन्ट्रोव्हर्सीचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या  टीआरपीवर परिणाम झाला आहे, असं म्हटलं जात आहे. कारण टीआरपी जास्त असणाऱ्या टॉप-10 मालिकांच्या यादीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे नाव नाहीये. 

Continues below advertisement


टीआरपी टॉप 10 लिस्टमधून  'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गायब झाला आहे. सध्या शोचे निर्माते  वादात सापडले आहेत, त्यामुळे शोची लोकप्रियता कमी होत असल्याचे बोलले जात आहे. टीआरपी लिस्टमध्ये कोणता शो कोणत्या नंबरवर आहे? हे जाणून घेण्यासाठी दर आठवड्याला केवळ चाहतेच नाही तर निर्माते आणि कलाकारही टीआरपी लिस्टची वाट पाहत असतात. तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो अनेक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या शोचा समावेज टीआरपीच्या यादीत नेहमी असतो. पण, यावेळी तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो टीआरपीच्या टॉप-10 मालिकांच्या यादीमध्ये नाहीये.


कोणता शो आहे नंबर वन?


दर आठवड्याप्रमाणे  या आठवड्यातही अनुपमा ही मालिका टीआरपी टॉप-10 लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अनुपमामध्ये आजकाल जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत.  'ये रिश्ता क्या कहलाता है' हा शो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर गुम हैं किसी के प्यार में, चौथ्या क्रमांकावर फालतु आणि पाचव्या क्रमांकावर इमली या मालिका आहेत. 


 ये है चाहतें ही मालिका सहावा क्रमांकावर आहे तर भाग्यलक्ष्मी ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर पंड्या स्टोअर, नवव्या क्रमांकावर नाम राधा-मोहन  आणि दहाव्या क्रमांकावर तेरी मेरी डोरिया ही मालिका आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा 11 व्या क्रमांकावर आहे.


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग 28 जुलै 2008 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेतील मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या: 


जेनिफरनंतर 'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टरची भूमिका साकारलेल्या प्रिया आहुजाने असित मोदींवर केले आरोप; म्हणाली...