(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Man Udu Udu Zhala : दीपूचा होणार गंभीर अपघात; सानिकाला होईल का बहिणीवरच्या प्रेमाची जाणीव?
Man Udu Udu Zhala : सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतणार आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात दीपूचा गंभीर अपघात होणार आहे. सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतणार आहे. दीपूच्या अपघातानंतर सानिकाला बहिणीवरच्या प्रेमाची जाणीव होईल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
'मन उडू उडू झालं' मालिकेत सानिकाने गरोदरपणाचं नाटक केल्याचं सत्य अखेर दीपूसमोर आलं आहे. मालिकेच्या आगामी भागात दीपू घरातील मंडळींना सानिका प्रेग्नेंट नसल्याचं सत्य सांगणार आहे. यासगळ्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसणार आहे. मालिकेच्या आगामी प्रोमोत दीपूचा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.
प्रोमोमध्ये सानिका म्हणते आहे, तुमचे आणि आमचे संबंध संपले असं म्हणत ती कार्तिकचा हात पकडून देशपांडे सरांच्या घरातून निघते. त्यानंतर दीपू कार्तिकच्या घरी जाऊन सानिका आणि कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान सानिका दीपूचे ऐकूण न घेता तिला धक्का देते. सानिकाच्या गैरवर्तणूकीमुळे दीपूचा गंभीर अपघात होतो.
View this post on Instagram
सानिकाचं खोटं नाटक दीपू सांगणार इंद्राला
देशपांडे सरांनी सानिकाच्या चोरओटीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान दीपू खूपच नाराज असते. दरम्यान ती इंद्राला सानिका आई होण्याचं नाटक करत असल्याचे सांगते. सानिकाचं हे खोटं नाटक सर्वांसमोर आल्यानंतर कार्तिक आणि सानिकाचं नातं तुटणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. सानिकाचं नाटक मालती आणि देशपांडे सरांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसणार आहे. तर इंद्राची आई सानिकाला घरात घेणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
संबंधित बातम्या