Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. आता यश-नेहाचं प्रेम होळीच्या रंगांत रंगणार आहे. 


होळीचा सण जवळ आल्याने मालिकेत गुलाबी रंगाची होळी साजरी होणार आहे. यश-नेहाचं प्रेम फुलताना दिसणार आहे. यश नेहाला तिचं आयुष्य रंगांनी भरून टाकणार असं कबुल करतो. त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत धुळवडीचा रंग चढताना दिसणार आहे. 


नेहा आणि यशचे प्रेम फुलत असले तरी परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अनेक रंजक वळणं येत आहेत. यश आणि नेहाने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली असली, तरी परी यशचा स्वीकारेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.





श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Kapil Sharma Show : 'तो परत आला तर, मी निघून जाईन!', अर्चना पूरण सिंह कपिल शर्मावर कडाडली!


The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!


Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha