Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' (Kapil Sharma Show) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडतो. लवकरच या कार्यक्रमात नवज्योत सिंह सिद्धूची (Navjot Singh Sidhu) एन्ट्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेटकरी अर्चना पूरण सिंहला (Archana Puran Singh) ट्रोल करू लागले आहेत. अखेर यावर अर्चना पूरण सिंहने भाष्य केले आहे. 


अर्चना म्हणाली,"द कपिल शर्मा'शोमधील माझी भूमिका खूप महत्त्वाची आहे. मी 100% देत काम करत आहे. पण नवज्योत सिंह सिद्धूमुळे मला ट्रोल करणे अत्यंत चुकीचे आहे. चॅनल आणि निर्मात्यांना सिद्धूला घ्यायचे असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी दुसऱ्या प्रोजेक्टकडे लक्ष देईल".





नेटकरी नवज्योत सिंह सिद्धूवर विविध विषयांवर मीम्स बनवत आहेत. लवकरच सिद्धू 'द कपिल शर्मा' शो परतणार असेही मीम्स मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. सिद्धूमुळे अर्चनाची खुर्ची धोक्यात येईल, असेही म्हटले जात आहे. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!


Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती


Rupa Dutta : एक नव्हे, आधीही अनेक चोऱ्या केल्या! अभिनेत्री रूपा दत्ताची पोलिसांसमोर कबुली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha