The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चक्क तिसऱ्याचं दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या तिसऱ्याच दिवशी चित्रपटाने 27 कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केले आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 


चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून चित्रपटाचे कलेक्शन जाहीर केले आहे. '#TheKashmirFiles ने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे...तिसर्‍या दिवशी चित्रपटाला 325.35 टक्के वाढ मिळाली आहे. आश्चर्यकारक.... शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी... एकूण 27.15 कोटी. ..' , असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


 





‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतात एकूण 561 चित्रपटगृहात, 113 परदेशातील स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. कमी स्क्रीन मिळूनही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप!


नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.



'द कश्मीर फाईल्स' चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सोशल मीडियावरही सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha