Majha Katta : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर डॉ.निलेश साबळे (Nilesh Sabale) पुन्हा एक नवा हास्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 27 एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ (Hastay Na Hasylach Pahije) हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमातून निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडगोळी तर असणारच आहे, पण enत्यांच्या जोडीला ओंकार भोजने देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. 


दरम्यान नुकतच डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी माझा कट्टावर हजेरी लावली. हवा येऊ द्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला, त्यानंतर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. पण आता हा देखील कार्यक्रम हवा येऊ द्या सारखा असणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण या प्रश्नाचं उत्तर डॉ. निलेश साबळेने माझा कट्टावर दिलं. तसेच यावेळी त्याने या कार्यक्रमाच्या फॉरमॅट सांगितला आहे.


कसा आहे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचा फॉरमॅट?


चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाप्रमाणेच हा देखील एक प्रमोशनल कार्यक्रम असणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम ही मंडळी देखील आहे. यामध्ये निलेश साबळे सूत्रसंचालनासोबत अभिनय करताना देखील दिसणार आहे. यामध्ये निलेश साबळे एका बाजूला एका सर्वसामान्य माणूस त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कलाक्षेत्रात काम करणारा एक व्यक्ती अशा दोन भूमिका साकारणार आहे. तो त्याचाच जुळा भाऊ असणार आहे. भाऊ कदम हा त्याचा मेहुणा आहे आणि ओंकार भोजने हा त्याच्या मेहुण्याचा मित्र असणार आहे. 


भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोघेही निलेशकडे वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येतात आणि त्याच्याकडून प्रत्येकवेळी पैसे घेतात. त्यांच्या बिझनेसच्या उद्घाटनासाठी निलेशचा जुळा भाऊ कोणत्यातरी सेलिब्रिटीला पाठवतो. ते सेलिब्रेटी म्हणजे त्या एपिसोडमध्ये प्रमोशनसाठी आलेली टीम असणार आहे. ती टीम मग नव्या बिझनेससाठी काम  देखील करते. असा सर्वसाधारणपणे कार्यक्रमाचा फॉरमॅट आहे. 


'नाच गं घुमा'च्या टीमने विकले सेटवर बटाटेवडे


‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमामध्ये भागामध्ये नाच गं घुमा या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी त्यांनी वडापावचा बिझनेस असल्याचं दाखवण्यात आलं. त्यासाठी नाच गं घुमा या चित्रपटाच्या टीमने सेटवर बटाटेवडे बनवून ते प्रेक्षकांना विकले. दरम्यान येत्या 27 एप्रिलपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Majha Katta : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भाऊ कदम आणि निलेश साबळे बघतात का? ओंकार भोजनेसमोरच दिलं उत्तर, म्हणाला 'मी गोस्वामी सरांना...'