Nilesh Sabale on Maharashtrachi Hasyajatra : निलेश साबळे (Nilesh Sabale), भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) यांचा नवा कार्यक्रम 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता आहे. पण सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. सुरुवातीला 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) कार्यक्रमाशी स्पर्धा करणारा हा कार्यक्रम अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम भाऊ कदम आणि निलेश साबळे बघतात का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी दिलेल्या उत्तराने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे यावेळी हास्यजत्रा कार्यक्रमातून घरोघरी पोहचलेला ओंकार भोजनेही यावेळी उपस्थित होता. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भाऊ कदम आणि निलेश साबळेला आवडतो का?


महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम भाऊ कदम आणि निलेश साबळे बघतात का आणि त्यांना तो आवडतो का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर निलेश साबळे याने म्हटलं की, हो आम्ही बघतो तो कार्यक्रम. सचिन गोस्वामी सर हे माझे गुरु आहे. त्यांच्याकडूनच मी लिहायला शिकलो. माझ्या लेखनावर बराचसा त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे मी तो कार्यक्रम पाहतो. कारण माझा पहिला कार्यक्रम महाराष्ट्राची सुपरस्टार याचे स्किट्स गोस्वामी सर लिहायचे. 


महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आला तेव्हा स्पर्धा निर्माण झाली का? 


'टेलिव्हिजनवर काम करताना तुमच्यासाठी स्पर्धा निर्माण होणारच. आपली लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हसवणं शक्य नाही. त्यामुळे काही लोकांना ते हसवतील काहींना आम्ही हसवू', असं मिश्किल उत्तर निलेश साबळेने दिलं. 


छोट्या ब्रेकनंतर हवा येऊ द्या परतणार का?


छोट्या ब्रेक चला हवा येऊ द्या परतणार का यावर बोलताना निलेश साबळेने म्हटलं की, आम्हाला चॅनलकडून सांगण्यात आलं होतं की, जानेवारीमध्ये कार्यक्रम बंद करुन तो ऑगस्टमध्ये पुन्हा सुरु करायचा. पण आता तो सुरु होणार की याबाबत मला कल्पना नाही. त्यामुळे चला हवा येऊ द्या पुन्हा परतणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना अजूनही लागून राहिली आहे.


ही बातमी वाचा : 


Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?