Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


'इमली' मालिकेतील करण वोहरा झाला बाबा; लग्नाच्या 11 वर्षानंतर पत्नीनं दिला जुळ्यांना जन्म


Karan Vohra Becomes Father:  छोट्या पडद्यावरील  'इमली' (Imli)  या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता करण वोहराच्या (Karan Vohra) घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. करण आणि त्याची पत्नी बेला यांना जुळी मुले झाली आहेत. करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.



Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हर्षद अतकरी, शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत


Kunya Rajachi Ga Tu Rani: छोट्या पडद्यावरील विविध मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची नंबर वन मालिका; जाणून घ्या TRP Report...


Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेच्या कथानकात ट्विस्ट आणत आहेत. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...



Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'मी स्वराजची आई आहे', मंजुळाने देवाची शपथ घेऊन सर्वांना सांगितलं; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात.  काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात पिहू आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही सर्वांना सांगते की, ती स्वराजची आई आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याने ठाण्यात सुरू केला स्वत:चा व्यवसाय; चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल


Aai Kuthe Kay Karte : हिंदीप्रमाणे मराठी (Marathi) मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारदेखील अभिनयाव्यतिरिक्त काही ना काही व्यवसाय करत आहे. कोणी कपडे, कोणी दागिने तर कोणी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील एका अभिनेत्याने ठाण्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा