Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात पिहू आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही सर्वांना सांगते की, ती स्वराजची आई आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा घसरुन पडतो. त्याचा पायाला दुखापत होते. ते पाहून मंजुळा म्हणते, "पाय मुरगळलाय वाटतं, हळद लावावी लागे."
यावर मोनिका म्हणते, "इथे जे काय घडलं ते तुमच्या कोणच्याच लक्षात आलं नाही? मी सांगते, एखादा मुलगा पडला तर सगळ्यात आधी धावत येणारी व्यक्ती म्हणजे त्याची आई, आता इथे हेच घडलं. स्वराज पडला आणि ज्या स्पिडनं मंजुळा आली हे, आपण पाहिलं. मंजुळानं हे सिद्ध केलंय की ती स्वराजची आई आहे." मोनिकाचं हे बोलणं ऐकून मल्हार म्हणतो,"मोनिका, तू मुर्खासारखं बोलत आहेस."
पुढे मोनिका म्हणतो, "स्वराज हा मंजुळाला आई म्हणून हाक मारतो, हे मी पाहिलं आहे. क्षमा वहिनी मला पहिल्या दिवसापासून माहित होतं, हा मुलगा आपल्याला फसवत आहे."
पाहा प्रोमो:
काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते. त्यामुळे स्वराज हा मंजुळाला 'आई' म्हणत असतो.
मोनिका ही स्वराजला देवासमोर घेऊन जाते आणि सत्य सांगायला लावते. स्वराज काहीही बोलत नाही. त्यानंतर मंजुळा म्हणते," मी देवाची शपथ घेऊन सांगते की, मी स्वराजची आई आहे."
इतर महत्वाच्या बातम्या: