Tharala Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत अर्जुनच्या हुशारीमुळे अस्मिताचा प्लॅन फसलेला पाहायला मिळणार आहे. 


'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, अस्मिता ही अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील सत्य जाणून घेण्यास उत्सुक आहे. ही बाब अर्जुनच्या लक्षात येते आणि तो सायलीसोबत रोमान्स करताना दिसतो. त्यामुळे आता अस्मिताचा प्लॅन फसलेला दिसणार आहे. 


'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Tharla Tar Mag Todays Episode Update)


'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन पूर्णा आजीला समजावताना दिसणार आहे. अर्जुनदेखील आपल्या पत्नीची काळजी घेत असल्याचं पूर्णा आजीला सांगतो. तसेच त्याच्या आयुष्यात पूर्णा आजी किती महत्त्वाची आहे हेदेखील तो तिला सांगतो. त्यांचं हे बोलणं ऐकूण सायलीला मात्र वाईट वाटतं. 






दुसरीकडे साक्षी आणि महिपत दोघेही आश्रमाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या रिसॉर्टचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी योजना आखत असतात. त्यांचा गुंतवणूकदारही अल्टिमेटम देऊन जातो की, रिसॉर्टचं काम सहा महिन्यात पूर्ण व्हायला हवा. आता साक्षीला मात्र काळजी वाटते की, रिसॉर्टचं काम लगेच सुरू झालं तर अर्जुनसमोर विलास मर्डर केसचं सत्य समोर येईल. तर साक्षी चैतन्याला भेटून त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करते. 


'ठरलं तर मग' या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अस्मिता खोलीत लपल्याचं अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो सायलीसोबत खोट्या प्रेमाचं नाटक करू लागतो. अचानक तो सायलीसोबत रोमँटिक वागायला सुरू करतो. आणि तिला मिठीत घेत आयलव्हयू म्हणतो. त्यामुळे अस्मिताला उगाचच खोलीत लपल्यासारखं वाटतं.  


संबंधित बातम्या


Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते !' ते 'तुझेच मी गीत गात आहे’; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...