Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, वीणा ही अनिरुद्धसाठी एक केक आणते. तो केक अनिरुद्ध सगळ्यांसमोर कापतो पण संजनाचा वाढदिवस त्याच्या लक्षात राहात नाही. त्यानंतर संजना आणि अनिरुद्धचं भांडण होतं. संजना ही अनिरुद्धच्या वागण्यामुळे दु:खी होते. त्यानंतर ती वाढदिवस साजरा करण्याऐवजी रडत बसते. आई कुठे काय करते मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की,  अरुंधती ही संजनाला समजवण्याचा प्रयत्न करते. 


आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजना रडत आहे. अरुंधती ही संजनाला शांत करण्याचा प्रयत्न करते. संजना अरुंधतीला म्हणते, 'मला कळत नाहीये की, हा माणूस एवढ्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो? स्वत:ची इमेज क्लिन ठेवण्यासाठी त्यानं मला बदनाम केलं. तो फक्त स्वत:चा विचार करतो.'  


संजनाच्या या बोलण्यावर  कांचन आजी म्हणतात,  'त्याच्या अशा वागण्यामागे काही तरी कारण असेल.' यावर अरुंधती म्हणते, 'काय कारण असू शकतं? आई, त्यांनी हेच माझ्या वाढदिवसाला देखील केलं होतं. संजनाला घेऊन आले होते आणि केक कापला होता. बायकोसोबत असंच वागायचं असतं, असं काही आहे का त्यांच्या डोक्यात?'


पुढे अरुंधती संजनाला म्हणते,  'अन्याय आणि अपमान सहन करुन नकोस. मी जी चुक केली ती तू करु नकोस. तुझ्याकडे बघून मला बळ मिळालं आहे. तू खचून जाऊ नकोस. आज तुझा वाढदिवस आहे. देवानं तुला चांगलं आरोग्य दिलंय, त्याच्यासाठी आभार त्याचे मान. तुला दु:खी करायचा अधिकार कोणालाही देऊ नको.' त्यानंतर सगळे संजनाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवतात.


पाहा प्रोमो: 






आई कुठे काय करते या मालिकेमध्ये  मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात तर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाल्या, 'मोस्ट फेव्हरेट...'