Maha Minister : दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्ष सन्मान करत आला आहे. आता होम मिनिस्टरच 'महामिनिस्टर' हे नवीन पर्व 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


'महामिनिस्टर' कार्यक्रमात बांदेकर भाऊजी विजेत्या वहिनीला चक्क 11 लाखांची पैठणी देणार आहेत. या पैठणीला सोन्याची जरी असेल पण ही 11 लाखांची पैठणी कशी असेल ही पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे प्रेक्षक महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहेत.






होम मिनिस्टर या कार्यक्रमाने 18 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या 18 वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्येदेखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे. यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि 11 लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Rang Majha Vegla : एकीला हवी आई, तर दुसरीला बाबा! मुलींच्या हट्टापायी एकत्र येणार कार्तिक आणि दीपा?


Grammy Awards 2022 : 'लीव्ह द डोर ओपन'ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार


Jayanti : आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार खास! ‘जयंती’ फेम ऋतुराज वानखेडेने व्यक्त केल्या भावना!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha