Debina- Gurmeet Baby : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आई बनली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेता गुरमीत चौधरीने (Gurmeet Choudhary)सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपण बाबा झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले, ‘आम्ही आमच्या बाळाचे या जगात स्वागत करत आहोत. 3-4-2022, तुमच्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद.’ या व्हिडीओमध्ये गुरमीत आणि देबिनाच्या हातात त्यांच्या मुलीचा हात दिसत आहे. छोट्या पाहुणीच्या आगमनाने गुरमीत आणि देबिना खूप खुश आहेत. व्हिडीओमध्ये या जोडप्याच्या आनंदाची झलक तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.


जोडप्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताच, चाहत्यांनी देबिना आणि गुरमीत यांच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सगळे त्यांना शुभेच्छा देत आहेत. गुरमीत-देबिनाच्या या व्हिडीओला जवळपास 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



लग्नाच्या 11 वर्षानंतर बनले पालक!


अभिनेत्री देबिना आणि अभिनेता गुरमीत 11 वर्षांनी आई-वडील झाले आहेत. आपल्या मुलीच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी आहेत. सोशल मीडियावर चाहते दोघांनाही अभिनंदनाचे मेसेजेस पाठवत आहेत. देबिना यापूर्वी तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी कनेक्टेड असतात.


देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी 9 फेब्रुवारी 2022 रोजी आपापल्या सोशल मीडिया हँडलद्वारे जाहीर केले होते की, ते आई-बाबा होणार आहेत.


नुकतीच भारती सिंहही आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला. सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर आपला आणि भारतीचा फोटो शेअर करत हर्षने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मुलगा झाला."



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha