Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकताच लॉस वेगासमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आधी 31 जानेवारीला होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या या रंगतदार सोहळ्यात 'लीव्ह द डोर ओपन' या गाण्याने यंदाचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. हे गाणं अमेरिकेतील लोकप्रिय गायक ब्रूनो मार्स आणि अॅंडरसन पाकने संगीतबद्ध केले आहे. 

विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

सर्वोत्कृष्ट गाणं : लीव्ह द डोर ओपनसर्वोत्कृष्ट रॉक सादरीकरण : फू फायटर्ससर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम : स्टार्टिंग ओव्हरसर्वोत्कृष्ट प्रोग्रेसिव्ह अल्बम : लकी डेसर्वोत्कृष्ट रॅप गाणं : केन्ये वेस्टसर्वोत्कृष्ट कोरल सादरीकरण : गुस्तावो डुडामेल, ग्रॅंटा गेशॉन, ल्यूक मॅकडार्फरसर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायन : कॅरोलिन शॉसर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : स्टीफन कॉक्ससर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स : ओलिविया रोड्रिगोसर्वोत्कृष्ट नृत्य : रुफुझ डू सोलपारंपारिक पॉप अल्बम - लव फॉर सेल सर्वोत्कृष्ट पॉप सिंगर अल्बम - लव्ह फॉर सेलसर्वोत्कृष्ट रॉक अल्बम - फू फायटर्ससर्वोत्कृष्ट रॉक गाणं - फू फायटर्स

ए आर रहमानदेखील ग्रॅमी सोहळ्यात सहभागी!

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या

RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात व्लादिमीर झेलेन्स्की यांचा खास संदेश; म्हणाले, 'भयानक शांततेचं रूपांतर संगीतात करा'

Grammy Awards 2022 : थाटात पार पडला ग्रॅमी पुरस्कार सोहळा; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha