Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी धमाल किस्से ऐकवताना दिसणार आहेत. 


'किचन कल्लाकार'च्या आगामी भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी भागात कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांसोबत धमाल किस्से शेअर करताना दिसणार आहेत. कविता मेढेकर आणि प्रशांत दामले यांनी अनेक वर्षे नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे प्रशांत दामलेंचे अनेक किस्से कविता मेढेकर प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत.





कविता मेढेकर एक किस्सा शेअर करणार आहेत. प्रशांत नावं विसरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. एका नाटकाच्या प्रयोगाला मी मेकअप करायला बसले होते त्यावेळी प्रशांत फोनवर कोणाशीतरी बोलत होता. त्यावेळी आपले हे आहेत ना ते आपले हे… असे म्हणत तो नावच सांगायचं विसरला. शेवटी सतीश असे म्हटल्यावर हा हा म्हणत समोरून त्याला सतिशचे आडनाव विचारले त्यावेळी मी त्याचे आडनाव थत्ते असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर खबरदार तू हा किस्सा कोणाला संगीतलास तर असे प्रशांत दामले यांनी मला बजावून सांगितले होते. 


संबंधित बातम्या


Hanuman Jayanti 2022 : शंकर महादेवन यांनी एका श्वासात गायले हनुमान चालीसा, व्हिडीओ व्हायरल


Alia Ranbir Wedding : पंजाबी झालं... आता बंगाली पद्धतीनं पार पडलं आलिया-रणबीरचं लग्न; जाणून घ्या काय आहे बातमी


Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'All That Breathes' या भारतीय माहितीपटाचे होणार विशेष स्क्रीनिंग