Man Udu Udu Zhala :  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण आता मालिकेत लवकरच एक नवा ट्विस्ट येणार आहे. 


इंद्रा आणि दीपूने प्रेमाची कबुली दिली असली तरी दीपूच्या घरच्यांना याबद्दल माहिती नाही. पण लवकरच हे सत्य आता मालतीसमोर येणार आहे. इंद्रा दीपूच्या केसात गजरा माळत असताना मालती पाहते. त्यामुळे तिला दीपू आणि इंद्राचं सत्य समजतं. आता मालती इंद्रा-दीपूच्या नात्याचा स्वीकारणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.





इंद्रा-दीपूच्या प्रेमाचं सत्य मालतीला कळल्याने इंद्रा आणि दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारतआहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


Me Vasantrao : डॉ. रघुनाथ माशेलकरांनी केले 'मी वसंतराव'चे कौतुक


Rang Majha Vegla : दीपिकाचं मन बदलण्यात दीपा-कार्तिकी होणार सफल! कार्तिककडे परतणार त्याची लेक!


Chandramukhi  : 'चंद्रमुखी'ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका; 'बाई गं...' लावणीमध्ये अमृताच्या दिलखेच अदा