Hanuman Jayanti 2022 : प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी (Shankar Mahadevan) एकाहून एक खास गाणी रसिकांच्या भेटीला आणली आहेत. रसिकांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या शंकर महादेवन यांचा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही वर्षांपूर्वी शंकर महादेवन यांनी एक अभिनव प्रयोग केला होता. त्यांनी 'ब्रेथलेस' संकल्पनेची बॉलिवूडमध्ये सुरुवात केली होती. त्यांचा हा ब्रेथलेस संकल्पनेवरचा अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. आता हनुमान जयंती निमित्त शंकर महादेवन रसिकांसाठी खास भेट घेऊन आले आहेत.
16 एप्रिलला हनुमान जयंती आहे. दरम्यान शंकर महादेवन यांनी गायलेल्या हनुमान चालीसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेमारू भक्तीच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये शंकर महादेवन हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. त्यांनी एका श्वासात हनुमान चालीसा गायले आहे.
चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी 16 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानजींची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावेळी हनुमान जयंती शनिवार असल्याने ती आणखीनच खास झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरते.
संबंधित बातम्या