Alia Ranbir Wedding : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले आहेत. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले. पण सध्या आलिया आणि रणबीरचा बंगाली वेशभूषेतील फोटो व्हायरल होतो आहे. 

Continues below advertisement


कोलकातातील आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी त्यांचे लग्न बंगाली रितीरिवाजांनुसार लावले आहे. चाहत्यांनी पुतळ्यांना आलिया आणि रणबीरचा फोटो लाऊन त्यांचं बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न लावलं आहे. बंगाली वेशभूषेतील आलिया आणि रणबीरच्या पुतळ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.





मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा काल पार पडला. रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती. आलियानं लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी नेसली होती. आलिया आणि रणबीरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






संबंधित बातम्या


Alia Ranbir Wedding : Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद


Alia Ranbir Wedding : अरेच्चा! आलियानं लग्नासाठी कॉपी केला कंगनाचा दोन वर्षापूर्वीचा लूक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण


Alia Ranbir Wedding : रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्स दीपिका आणि कतरिनाची रिअॅक्शन; रणबीर आलियाच्या लग्नानंतर म्हणाल्या...