Cannes Film Festival 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) 17 ते 28 मे दरम्यान होणार आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खास असणार आहे. भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.
'कान्स' सारख्या नावाजलेल्या फिल्म फेस्टिव्हल भारताचा माहितीपट झळकणार असल्याने भारतीय सिनेप्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जागतिक सिनेमाची पंढरी अशी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची ओळख आहे. दहा दिवस हा फिल्म फेस्टिव्हल चालणार आहे. 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे. दोन भावांवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.
फ्रेंच दिग्दर्शक मायकल हजानाविसियस यांच्या हस्ते 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चे उद्घाटन होणार आहे. तसेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही सिनेमाचा प्रीमिअर केला जात नाही. पण यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या