Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानात भर टाकणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धक सहभागी होत असतात. आता आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मयंकने एक कोटी रुपये जिंकले आहेत. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' हे त्याने खरं करुन दाखवलं आहे.


हरियाणा येथील महेंद्रगढमध्ये राहणाऱ्या मयंकच्या कारनाम्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनीदेखील मयंकची दखल घेतली आहे. मयंक 'कौन बनेगा करोडपती ज्युनियर'मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मयंकला फोन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


मुख्यमंत्री मनोहर यांनी मयंकच्या वडिलांसोबत फोनवरुन बोलणं केलं आहे. तसेच त्यांना चंडीगढला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तसेच मयंकचा 'कौन बनेगा करोडपती'मधला व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"हरियाणा येथील महेंद्रगढमधील लाल, आठवीत शिकणाऱ्या मयंकने 'केबीसी ज्युनियर'मध्ये आपलं ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर एक कोटी रुपये जिंकले आहेत. मयंकच्या वडिलांचं फोनवरुन अभिनंदन केलं तसेच लेकाच्या पुढील वाटलाचीसाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत". 






अमिताभ बच्चन यांना हैराण करणारा मयंक


'कोन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. 'कोन बनेगा करोडपती 15' आता 'किड्स ज्युनिअर्स वीक' साजरं करत आहे. या कार्यक्रमात हरियाणा येथील आठ वर्षीय मयंक सहभागी झाला असून आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. मयंकच्या ज्ञानाने बिग बीदेखील हैराण झाले होते. 


मयंकआधी आठ वर्षांचा विराट कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झाला होता. छत्तीसगडमधील भिलाई येथे राहणाऱ्या विराटचं एक कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं. पण विराट छत्तीसगडमधील 'गुगल बॉय' म्हणून लोकप्रिय आहे. आतापर्यंत त्याला 30 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. केबीसीमध्ये त्याने 3 लाख 20 हजार रुपये जिंकले. 


संबंधित बातम्या


Kaun Banega Crorepati 15: एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही आठ वर्षांचा 'विराट'; 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?