Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचा 15 वा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विविध स्पर्धक केबीसीच्या हॉटसीटवर बसतात. अशातच कौन बनेगा करोडपती-15 चा एक एपिसोड सध्या चर्चेत आहे. कारण या एपिसोडमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा हॉट सीटवर बसला. या मुलानं न टेंशन घेता प्रश्नांची उत्तरं पटापट दिली. पण एक कोटींसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर या मुलाला देता आलं नाही.


बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांना भिलाईच्या 'विराट'नं दिली उत्तरं 


इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा 8 वर्षांचा विराट अय्यर कौन बनेगा करोडपती ज्युनियरच्या पहिल्याच आठवड्यात हॉट सीटवर पोहोचला. विराट हा छत्तीसगडमधील भिलाई येथे राहतो. 21 नोव्हेंबर रोजी विराट अय्यरने मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली पण एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यानं चुकीचं दिलं.


एक कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-


पीरियॉडिक टेबलमधील 96 आणि 109 अणुक्रमांक असलेल्या दोन घटकांच्या नावांमध्ये विशेष काय आहे?


पर्याय-


A-नोबेल विजेत्यांच्या नावांवर आधारित आहेत
B-महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आधारित आहेत
C-भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर आहेत
D-त्यांची नावे नाहीत


बरोबर उत्तर होते –B महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आधारित आहेत


छत्तीसगडचा 'गुगल बॉय'


विराट हा छत्तीसगडमध्ये गुगल बॉय म्हणूनही ओळखले जाते. विराटची आई नीलिमा अय्यर यांनी सांगितले की, केबीसी ज्युनियरसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी सुरु होती. त्याचवेळी विराटने मोबाईल अॅपद्वारे प्रश्नांची उत्तरे दिली. पहिल्या फेरीत त्याची निवड झाली. यानंतर विराटची निवड झाल्याचा आम्हाला फोन आला. त्यानंतर त्यानं ऑनलाइन ऑडिशनमध्ये भाग  घेतला. विराटने 24 सप्टेंबर रोजी ऑनलाइन ऑडिशन दिले. यामध्ये 20 प्रश्न विचारण्यात आले. यापैकी विराटने 18 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.


विराट हा नीलिमा अय्यर आणि कल्याण विजय यांचा मुलगा आहे. तो भिलाई येथील सेक्टर 10 येथील श्री शंकराचार्य विद्यालयात इयत्ता 3 च्या वर्गात शिकत आहे. विराटला आतापर्यंत 30 पेक्षा जास्त अधिक पुरस्कार मिळाले आहेत. तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेतो. केबीसीमध्ये एक कोटींसाठी विचारण्यात आलेल्या  प्रश्नात विराट थोडा गोंधळला आणि त्याने चुकीचे उत्तर दिले. त्यामुळे तो 3 लाख 20 हजार रुपये जिंकू शकला.


संबंधित बातम्या


Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही सात कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?