Sa Re Ga Ma Pa Winner Albert Kabo Lepcha : 'सा रे ग म प 2023' (Sa Re Ga Ma Pa 2023) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला. गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. अनेक जण अल्बर्ट लेप्चाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. अल्बर्ट लेप्चानं नुकतीच आज तकला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अल्बर्ट लेप्चानं त्याच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल सांगितलं आहे. 


Albert Kabo Lepcha Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : नऊ महिन्याच्या लेकीला गमावलं


मुलाखतीमध्ये अल्बर्टनं सांगितलं,"मला ही ट्रॉफी माझ्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना समर्पित करायची आहे. पहिली व्यक्ती माझी दिवंगत मुलगी  आणि दुसरी व्यक्ती माझी पत्नी आहे. या दोघांमुळेच मी या रिअॅलिटी शोमध्ये आलो. नाहीतर मी इथपर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो.मी  पाच महिन्यांपूर्वी माझ्या 9 महिन्यांच्या मुलीला गमावले आहे. तिच्या जाण्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या पत्नीने  सांगितले की,  तू गाण्यावर लक्ष केंद्रित कर."


Albert Kabo Lepcha Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून केलं काम


स्ट्रगलबाबत अल्बर्टनं सांगितलं की,  माझ्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. मी पैशासाठी अनेक ठिकाणी काम केलं. रेस्टॉरंटमध्ये वेटर, टुरिस्ट गाईड आणि बारमध्ये गाणे गायचं देखील काम केलं. माझा पगार 15 हजार रुपये होता. तेव्हा मला सर्वात जास्त वाईट वाटत होतं कारण माझ्या पत्नीला माझ्यामुळे हे सर्व सहन करावे लागले. लग्नानंतर मला जाणवले की मी तिला तो आनंद देऊ शकलो नाही, ज्याची ती पात्र होती. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी राहावे लागले. मी सिलीगुडीमध्ये वेटर म्हणून केलं."


Albert Kabo Lepcha Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : जिंकलेल्या रकमेचा कसा करणार वापर?


'सा रे ग म प 2023'जिंकल्यानंतर  अल्बर्टला दहा लाख रुपयांचे बक्षीस आणि कार  मिळाली आहे. जिंकलेल्या रकमेचा वापर कशासाठी करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अल्बर्ट म्हणतो, "मी सध्या संगीत क्षेत्रात कशी गुंतवणूक करावी याचा विचार करत आहे. भविष्यात स्टुडिओ सुरू करण्याचा देखील मी विचार करत आहे. यासोबतच उरलेले पैसे मी माझ्या पत्नीला देईन."






'सा रे ग म प 2023' ची ट्रॉफी जिंकल्यानंतर अल्बर्ट म्हणाला, 'मी एक स्वप्न घेऊन या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होतो, आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे. मी एखाद्या मोठ्या रिअॅलिटी शोचा भाग व्हावे अशी तिची इच्छा होती. आज मी विजेता झालो आहे, म्हणून असं तुम्ही म्हणू शकता की, मी तिचे स्वप्न जगत आहे.'


संबंधित बातम्या:


Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला 'सा रे ग म प 2023'चा विजेता! म्हणाला,"पत्नीच्या पाठिंब्यामुळे जिंकलो"