Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दररोज नवनवे ट्विस्ट येत आहेत. या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होत आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 17'ची स्पर्धक अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. पण रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण त्यानंतरही अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील वाद सुरूच आहे. अशातच अभिनेत्रीने विकीला घर सोडण्याची धमकी दिली आहे.


'बिग बॉस 17'मुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं वैयक्तिक आयुष्य सर्वांसमोर येत आहे. काही दिवसांपूर्वी नावेद सोल आणि जिग्ना वोरा यांचा 'बिग बॉस 17'मधील प्रवास संपला. पण त्यानंतर अंकिता आणि विकीच्या भांडणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 


'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विकी जैन, समर्थ जुरेल अभिषेक कुमारच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करताना दिसत आहेत. त्यावेळी अंकिता आणि विकी यांचा वाद सुरू होतो. अंकिता विकीला म्हणते,"तुला काय वाटतयं हे मला माहिती आहे. तू कोणालाच उत्तर देणार नाही. चिंटू, पिंटू, टिंटूला तुझ्यापासून दूर ठेव. तू आता कोणालाच काही खरं सांगणार नाही. तू या आठवड्यात कोणासोबतच बोलणार नाही. तुला जे लोक आवडतात त्यांच्यासोबत तू थांबतोस. टेंशन न घेता खेळ". 






अंकिता विकीला म्हणते,"जर एखाद्या व्यक्तीला तुझ्यासोबत बोलायचं नसेल तर त्याच्यासोबत बोलू नको. हा खेळ आहे. हे लोक आपल्या घरी येणार नाहीत. जर या लोकांना घेऊन तू आपल्या घरी आलास तर मी खरच घर सोडून निघून जाईल".


'बिग बॉस 17'मधील 'हे' स्पर्धक डेंजर झोनमध्ये


'बिग बॉस 17'च्या या आठवड्यात रिंकू धवण, विकी जैन, खानजादी, अंकिता लोखंडे, नील भट्ट, मन्नारा चोप्रा, अनुराग आणि अरुण शेट्टी हे कलाकार डेंजर झोनमध्ये आहेत. नुकताच जिग्ना वोराचा 'बिग बॉस 17'मधील प्रवास संपला आहे. आता या स्पर्धकांमधून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Orry: पार्टीमध्ये लोकांना चिकटतो, फोटोसेशन करतो अन् 'ओरी' एवढे पैसे कमावतो; आकडा ऐकून भाईजानही झाला शॉक