मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) तिचा सौंदर्यासाठी ओळखली जाते. कनिका अनेकदा तिच्या फोटोंनी लक्ष वेधते. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी नेहमीच तिच्याबाबत अधिक जाणण्यासाठी उत्सुक असतात. कनिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि सर्व अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करते. कनिकाने अलिकडेच सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.


अभिनेत्री कनिका मानचं वजन फक्त 25 किलो 


टीव्ही अभिनेत्री कनिका मानने पोस्टने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. कनिका मानने एका नवीन पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिचं वजन फक्त 25 किलो आहे. यामुळे तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. कनिकाचं वजन फक्त 25 किलो असल्याचं पाहून इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांनाही धक्काच बसला आहे. नेटिझन्ससह सर्वांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिने स्वत:ला इतकं मेन्टेन कसं ठेवलं आहे, हे तिच्या मित्र-मैत्रिणींसह अनेकांना जाणून घ्यायचं आहे.


फोटो शेअर करत दिला पुरावा


कनिका मानने 17 जून रोजी तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया अपडेट केली. कनिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. यातील पहिल्या फोटोमध्ये वजन काट्यावरील आहे. या फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. या फोटोमध्ये तिचे पाय आणि डिजिटल वजन काटा दिसत आहे. या फोटोमध्ये डिजिटल वजन स्केलवर तिचं वजन फक्त 25.7 किलो दिसत आहे. 


कनिकाची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल






नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया


या फोटोमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या फोटोवर नेटकरी खूप मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एकाने विचारलं की, तुम्ही वजन काटा कुठून घेतला. तर दुसऱ्याने लिहिलंय की, हा वजन काटा तुम्ही मीशोवरून घेतला आहे का? तर काही जण तिला तिचं वजन मेन्टेन करण्यासाठी टीप्स विचारत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप, 9 वर्ष मोठी अभिनेत्री रिद्धिमा पंडितच्या प्रेमात, लवकरच करणार लग्न? चर्चांना उधाण