Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सागर-मुक्ता हे प्रेमाच्या रंगात रंगून गेले आहेत. मुक्तासाठी सागरही वटपौर्णिमेचा उपवास ठेवणार आहे. तर, दुसरीकडे आता मिहिकाबाबत हर्षवर्धनच्या मनात वाईट विचार आले आहेत. माधवी ही सावनीला खडे बोल सुनावणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?



लाडाने सागरवर मुक्ता चिडणार


मिहिका मुक्ताला फोन करते आणि सगळ्यांसमोर कीस केल्याबद्दल  कौतुक करत फिरकी घेते. मुक्तादेखील मिहिकावर लाडाने चिडते. 


कीस प्रकरण मिहिरला सांगितल्याने मुक्ता सागरवर नाराज असते. किचनमध्ये मुक्ता सागरशी व्यवस्थित बोलत नसते. सागरला काहीच कळत नाही की नेमकं काय झाले? सागर मुक्ताला चिडण्याचे कारण विचारतो. त्यावर मुक्ता तुम्ही मिहिरला कीस बद्दल का सांगितले असे विचारते. सागर-मुक्ता दोघेही प्रेमाच्या रंगात रंगून जात असताना तेवढ्यात सई मुक्ताला आवाज देते. सईच्या आवाजाने दोघेही भानावर येतात.  



मुक्तासाठी सागरचा उपवास... 


वटपौर्णिमेच्या निमित्ताने मुक्ताने सागरसाठी उपवास ठेवते. वटपौर्णिमेची कोळी आणि गोखले कुटुंबातही लगबग सुरू असते. माधवीदेखील पुरुसाठी उपवास ठेवते. तर, तिकडे सागरही मुक्तासाठीही उपवास धरतो. इंद्रा सागरला उद्देशून इकडे उलटी गंगा वाहतेय असे म्हणते. इंद्रा सागरला समजावण्याचा प्रयत्न करते. पण, सागर आपल्या मतावर ठाम असतो. इंद्रा सईला सावित्रीची गोष्ट सांगते. नात्यातील प्रेम, विश्वासाचे महत्त्व सागर सईला समजवून सांगतो. सईदेखील तुलाही मुक्ताई कायमची हवीय यासाठी तू उपवास ठेवला असल्याचे सांगते. 


हर्षवर्धनची मिहिकावर वाईट नजर... 


हर्षवर्धनच्या घरी वेडिग प्लॅनिंगसाठी एक टीम जाते. या टीममध्ये मिहिकादेखील असते. यावेळी ओळखीची लोक आहेत असे हर्षवर्धन म्हणतो. वेडिंग प्लानरला ही बाब समजत नाही. त्यावेळी मिहिका तिला सांगते की, माझं लग्न ज्या मुलासोबत ठरलेय, त्याच्या बहिणीचे लग्न हर्षवर्धन सरांसोबत होत असल्याचे सांगते. हर्षवर्धनच्या मनात वेगळंच सुरू असते. हर्षवर्धन वाईट नजरेने मिहिकाकडे पाहत असतो. सावनीपेक्षा मिहिका किती सुंदर दिसते. सावनीदेखील सहा वर्षांपूर्वी अशीच सुंदर दिसत होती असा मनात हर्षवर्धन विचार करत असतो. 


सावनीला माधवी सुनावणार खडे बोल... 


माधवी-पुरुचे बोलणं ऐकून सावनीदेखील उपवास ठेवते. पण, किचनमध्ये  कोथिंबरीची वडी आणि  थालीपीठ असे जेवण माधवीने केले असते. सावनी माधवीला उपवास ठेवला असल्याचे सांगते. माधवी किचनमधून बाहेर पडते. तेव्हा सावनीला थालीपीठ खाण्याचा मोह आवरत नाही. माझं लग्न अजून होणार आहे, मी पुढील वर्षी उपवास ठेवणार असे म्हणते आणि लपून थालीपीठ खाण्याचा प्रयत्न करते. सावनी थालीपीठ खात असताना माधवी पाहते आणि तुमचा उपवास होता ना असे विचारते. त्यावर सावनी हे उपवासाचे थालीपीठ होते ना असा उलट प्रश्न करते. त्यावर माधवी म्हणते की हे थालीपीठ कांदा, भाजणीच्या पीठापासून तयार केलेले होते. आपल्या उपवासाचा खोटेपणा उघड होणार हे लक्षात येताच सावनीही माधवीवर आरोप करत तुम्ही जाणीवपूर्वक माझा उपवास मोडला असल्याचा आरोप करते. सावनी चढ्या आवाजात बोलत असताना माधवी तिला आवाजाची पातळी कमी करण्यास सांगते. तुझ्याकडे संयम, निग्रह नाही असे सांगते आणि मुक्ताचे कौतुक करते. मुक्ताने सागरसाठी उपवास ठेवला असणार आणि तिने पाण्याचा थेंबही घेतला नसल्याचे सांगते. मुक्ताचे कौतुक ऐकून सावनी चिडते आणि मुक्ताची वटपौर्णिमा कशी होते हेच पाहते असे मनात म्हणते.