मुंबई : भारतीय संघाचा (Indian Cricketer) युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) क्रिकेटसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही बऱ्याच वेळा चर्चेत असतो. आता शुभमन गिलची  डेटिंग लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी (Daughter) सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) गिलचं नाव बऱ्याच काळापासून जोडले जात होते. मात्र, अलीकडेच शुभमन गिल सारा तेंडुलकर सोबत ब्रेकअप झालं असून तो टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितसोबत (Ridhima Pandit) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता खुद्द अभिनेत्रीनेच सत्य सांगितले आहे.


टीम इंडियाचा प्रिन्स टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात 


शुभमन गिल सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप झाल्याची सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. एवढंच नाही,  तर, शुभमन गिल छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धिमा पंडितसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. रिद्धिमा पंडित शुभमन गिलपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. या वर्षाअखेरीस हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.


शुभमन गिल रिद्धिमा पंडितलवकरच करणार लग्न?


रिद्धिमा पंडित छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रिद्धिमा बिग बॉस ओटीटीमध्येही दिसली आहे. रिद्धिमाने 'बहू हमारी रजनीकांत' आणि 'खतरा खतरा' यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. बहू हमारी रजनीकांत या टीव्ही मालिकेमध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ओटीटी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही दिसली होती. 


रिद्धिमा पंडितने सांगितलं सत्य


रिद्धिमा पंडितने शुभमन गिलसोबत लग्नाच्या बातम्यावर सोशल मीडियाद्वारे स्पष्ट करत, या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा रिद्धिमा पंडितने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं आहे.रिद्धिमाने सांगितलं की, शुभमन गिल एक उत्तम खेळाडू आहे. जेव्हा त्याच्यासोबत माझं नाव जोडलं केलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. माझ्या बहिणीने मला सर्वात आधी फोन करुन विचारलं, तेव्हा मी झोपेत होती आणि याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर मला पत्रकाराचे फोन येऊ लागले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट केलं की, मी शुभमनला कधी भेटलीही नाही आणि माझं लग्न ठरलं तर मी स्वत: याबाबत सर्वांना सांगेन.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shubman Gill : रोहित शर्माला अनफॉलो केल्याच्या चर्चा, शुभमन गिलची एक कृती अन् एका दगडात दोन पक्षी मारले...