India’s Got Talent 9 Winner : छोट्या पडद्यावरील 'इंडियाज गॉट टॅलेंट-9' (India’s Got Talent 9 Winner) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल (18 एप्रिल) पार पडला. दिव्यांश कचोलिया आणि मनुराज सिंह राजपूत यांची जोडी ही या इंडियाज गॉट टॅलेंट सिझन 9 ची विजेती ठरली. दिव्यांश आणि मनुराज या दोघांना वीस लाख रूपये, एक आलिशान गाडी आणि ट्रॉफी या सर्व गोष्टी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. दिव्यांश आणि मनुराज यांच्या ग्रँड फिनाले एपिसोडमधील परफॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली.
'इंडियाज गॉट टॅलेंट 9' या शोची पहिली रनर-अप इशिता विश्वकर्माला पाच लाख रूपये देण्यात आले. तर दुसऱ्या रनर अप असणाऱ्या बम फायर क्रू ग्रुपला देखील पाच लाख रूपये देण्यात आले.
'इंडियाज गॉट टॅलेंट 9' च्या महाअंतिम सोहळ्याला हिरोपंती 2 या चित्रपटाच्या टीमनं हजेरील लावली होती. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सुपरस्टार सिंगर 2 चे परिक्षक हिमेश रेशमिया, सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि कॅप्टन अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, सलमान अली आणि सयाली कांबळे हे देखील या ग्रँड फिनाले सोहळ्याला उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :