Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिनेता मिका सिंह (Mika Singh) हा वयाच्या 45 व्या वर्षी लग्न करणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. आता या  'स्वयंवर: मिका दी वोटी' या शोमध्ये अभिनेत्री हिना खाननं (Hina Khan)  हजेरी लावली आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या एका एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये हिना 'दुसऱ्यावर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम केले पाहिजे.' असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या शोमधील स्पर्धकांना हिना काही टिप्स देताना दिसत आहे. शोमधील स्पर्धकांना हिना खास कॅट वॉक करताना शिकवत आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये हिनानं दिलेल्या टिप्स शोमधील स्पर्धक ऐकताना दिसत आहेत.  प्रोमो व्हिडीओमध्ये हिना ही बेबी पिंक कलरची साडी, ब्रालेट ब्लाउज, स्टोनचे कानातले आणि न्यूड मेकअप अशा लूकमध्ये  दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ:






या सेलिब्रिटींनी लावली शोमध्ये हजेरी:


मिकाच्या स्वयंवरात फराह खान, रवीना टंडन, कपिल शर्मा आणि दिव्यांका त्रिपाठी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. फराह खान ही मिका सिंहला तिचा भाऊ मानते. त्यामुळे तिनं या शोमध्ये हजेरी लावली होती. 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी झाल्या आहेत. देशभरातील विविध भागामधून या मुली स्वयंवरासाठी आल्या आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मिका हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा :